अभिमानास्पद ! 'करंजे'चा किरण दगडे बी.ई इलेक्ट्रीकल मधून पुणे विद्यापीठात प्रथम.
सोमेश्वरनगर - पुणे विद्यापीठाने एप्रिल/ मे सण २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत बी.ई इलेक्ट्रीकल ब्र्यंच मधुन बारामतीतील करंजे येथील जोशीवाडी गावचा कीरण विष्णू दगडे हा विद्यार्थी पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकासह रमाकांत उर्फ दादासाहेब मनोहर एकबोटे गोल्ड मेडल व जी.एच.रायसोनी गोल्ड मेडल मीळवत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.
पी. व्ही.जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधून पदवी चे शिक्षण पूर्ण केले माध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे येथुन पुर्ण करत दहावीत प्रथम क्रमांक मिळविला
पुढील शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथे डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर या शाखेतुन पुर्ण करीत सर्व शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळवित तेथे ही गोल्ड मेडल प्राप्त केले ,पुणे विद्यापीठाने २९ डिसेंबर २०२३ रोजी रँक लीस्ट जाहीर केली.
करंजे ग्रामपंचायत सदस्य विष्णू निवृत्ती दगडे यांचे चिरंजीव असल्याने मान्यवर ग्रामस्थांनी किरण चे विशेष कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .