माध्यमिक हायस्कुल सोरटेवाडी येथे सण २००२-३ चा माजी विध्यार्थी स्नेह मेळावा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील माध्यमिक हायस्कुल सोरटेवाडी,करंजे येथे सण २००२-३ चा माजी विध्यार्थी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.
यावेळी सत्कार मूर्ती व प्रमुख पाहुणे माजी मुख्यध्यापक नरुटे सर ,अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक लकडे सर , त्यावेळी असणारे गुरुजन वर्गशिक्षक नेवसे सर उपस्थित होते. सर्व मान्यवर यांचा सत्कार हार फेटा श्रीफळ देत करण्यात आला.
माजी विद्यार्थी प्रवीण सोरटे यांनी "खरच सर परत एकदा शाळेत घेताल का ?..ही कविता सादर केली या कवितेने उपस्थित शिक्षकांसह सर्व मान्यवर माजी विद्यार्थी यांची मने जिंकली व प्रवीण चे कौतुक केले.
तसेच माजी विद्यार्थी एकत्र येत जिथे आपण आयुष्याचे धडे शिकलो त्या शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून शाळेतील सर्व भिंती वरती बोलकी चित्रे पेंटिंग चा खर्च केला व
माजी विद्यार्थी आपत्कालीन फंड तयार केला आहे जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना याचा भविष्यात फायदा होणार आहे त्यामुळे उपस्थित शिक्षक मान्यवरांनी याचे स्वागत केले.
या स्नेह मेळाव्याचे आयोजन प्रविण सोरटे , महेश आटोळे , स्नेहल सोरटे , वनिता सोरटे , तानाजी करचे , मंगेश लकडे , अतुल सोरटे , शेखर शिंदे सर्व माजी विद्यार्थी यांनी केले होते.
सूत्रसंचालन प्रविण सोरटे , प्रस्थावना : स्नेहल सोरटे यांनी केले तर मनोगतिय मध्ये प्रविण सोरटे , स्नेहल सोरटे , तानाजी करचे , मंगेश लकडे ,पूनम सोरटे , निलेश पवार , विकास पवार यांनी केले