वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांचे बारामती बस स्टॅन्ड समोर आंदोलन सुरू
सदर आंदोलन ठिकाणी भेट देऊन भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,संपर्क प्रमुख शुभम गायकवाड,जिल्हा अध्यक्ष असलम वस्ताद शेख,बारामती शहर अध्यक्ष निखिलभाई खरात,बारामती शहर संघटक समीर खान,सामाजिक कार्यकर्ते संतोष भोसले,विनोद सवाने उपस्थित होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्या..
1) सदरील क्षेत्रातील महार वतनी जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे किंवा या जागेच्या संदर्भात शासन नियमानुसार पाच पट मोबदला देण्यात यावा.
2) सदरील जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर Atrocity कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात यावा.
3) सदरील जागेच्या कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर नोंदी करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
4) सदरील जागा महार समाजाची असल्याने या समाजाचे श्रध्दास्थान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती बस स्थानकास देण्यात यावे.