राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेकडून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रियांका शेंडकर यांनी केला महिला शिक्षिकांचा सन्मान
सोमेश्वर - राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेकडून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी बुधवार दि ३ रोजी बारामती तील को-हाळे बुद्रुक येथे साजरी करण्यात आली...
बालविवाह, फक्त चुल आणि मुल अश्या विचारांची चौकट मोडून सामाजिक परिवर्तनाचे विचार रुजवण्यासाठी आपले आयुष्य खर्च करनाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांच्या व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष प्रियांका राहुल शेंडकर यांनी सिद्धेश्वर हायस्कूल को-हाळे बु येथील महिला शिक्षिकांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री सतीश मामा खोमणे आणि बारामती तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष वनिता बनकर, युवती उपाध्यक्ष स्वप्नाली पवार उपस्थित होत्या.
शाळेतील सर्व महिला शिक्षकाना सन्मान चिन्ह, गुलाबपुष्प,आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिलाशिक्षिका- श्रीमती. धायगुडे मॅडम होत्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक थोरात ए. बी सर व शाळेचा संपूर्ण स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते, प्रसंगी काही विद्यार्थिनी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साळवे मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक थोरात ए. बी सर यांनी मानले
याप्रसंगी सिध्देश्वर हायस्कूल शाळेचे तसेच संस्थेचे व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.