आनंद विद्यालयातील सण १९९२-९३ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न..
तब्बल ३१ वर्षांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ येथील आनंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने जपले ऋनानुबंध. हा स्नेह मेळावा म्हणजे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी... असाच होता. आनंद विद्यालय होळ येथील दहावीतील सन १९९२-९३ सालातील वर्ग मित्र-मैत्रिणीचा तब्बल ३१ वर्षांनी स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तत्कालीन दहावीच्या मिञ व मैत्रीनी आज हे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या स्नेह मेळाव्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि अनेकांना गहिवरून आले. गतकाळातील जुन्या आठवणींना उजाळा देत मेळावा आपल्या गुरूजनांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थीनी या स्नेहमेळाव्याचे नेटके आयोजन केले होते या स्नेहमेळाव्यासाठी आपल्या गुरूजनांना निमंत्रित करत हार श्रीफळ शाल व एक सन्मानचिन्ह देत त्यांचा येतोचित सन्मान करण्यात आला.झालेल्या सन्मान गुरुजींच्या दृष्टीने अनमोल होता न कळत याचं विद्यार्थ्यांना आम्ही रागावलो, शिक्षा केली त्या माज्या विद्यार्थ्यांनी आमचा सन्मान यात ते समाधानी होते तर असा पहिल्यांदाच सेवानिवृत्त नंतर झाला असेही ते म्हणाले तर सध्याचे सर्वांचे यश पाहता एक समाधानही होते.
या स्नेह मेळाव्यास विशेष उपस्थितीत पी डी सी बँक संचालक दत्तोबा येळे व टी एन करचे यांची होती तर या स्नेह मेळाव्याचे नियोजन प्रवीण सूर्यवंशी, बापू कोकरे,ताहीर शेख ,,दत्ता पवार, धनु गौडगाय, भाऊ लिंबरकर, डॉ सुधीर कारंडे यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी कारंडे सर, वनवे सर, पिसाळ सर , माळवे सर ,मुख्याध्यापिका करचे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मनोगतिय भाषणं करत निमंत्रित केल्या बद्दल आभार मानले.