बारामती ! लोकशाही पत्रकार संघाच्या निरिक्षक पदावर डॉ. नानासाहेब भोळे यांची निवड
बारामती (प्रतिनिधी) - पुणे बारामती येथील डॉ नानासाहेब दुर्गादास भोळे यांची लोकशाही पत्रकार संघाच्या राज्याच्या निरिक्षक पदावर निवड झाली आहे. लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवतराव वैद्य यांनी नुकतीच ही निवड घोषीत केली आहे . पुणे जिल्ह्यातील बारामतीतील सोमेश्वर येथील प्रसिद्ध व सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून ओळख असलेले डॉ नानासाहेब दुर्गादास भोळे आता नव्यानेच पत्रकारिता क्षेत्रात आले आहेत.
सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे आणि या माध्यमातूनही काही सामाजिक कार्य
करण्याचा त्यांचा माणस आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे, बीड, लातूर, परभणी नाशिक,धाराशिव आणि
सोलापूर या जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगलाच संपर्क
आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत लोकशाही
पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवतराव वैद्य यांनी त्यांची.राज्याच्या निरिक्षक पदावर निवड घोषीत केली आहे. या त्यांचे निवडीबद्दल
अभिनंदन होत आहे.