फुले प्रहार संस्थेच्या वतीने शनिवारी इंदापूरात पत्रकार सन्मान सोहळा.
सावित्रीच्या लेकींसह विविध मान्यवरांचा होणार सन्मान.
इंदापूर :आद्य पत्रकार,दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हा देशभरात पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जातो.फुले प्रहार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन यावर्षी शनिवार दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म दिनी पत्रकार, इलेक्ट्राॅनिक मिडीया चॅनल पत्रकार, वार्ताहार,विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणारे मान्यवर व सावित्रीच्या लेकींचा विशेष सन्मान सोहळा राधीका हाॅॅॅल,सोलापूर-पुणे हायवे रोडलगत, महात्मा फुले पुतळ्यासमोर, इंदापूर या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर बोराटे,निमंत्रक प्रकाश आरडे, बाळासाहेब सुतार, श्रीयश नलवडे,दत्ता मिसाळ, बापू बोराटे, मुक्तार काजी,आशोक घोडके,धनाजी शेंडगे,डाॅ. सिद्धार्थ सरवदे,
सतिश जगताप यांनी दीली.
पत्रकार दिन सन्मान सोहळ्याचे सलग चौथे वर्ष असुन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदिय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होत असुन प्रमुख पाहुणे म्हणुन गणेश इंगळे (डी.वाय.एस.पी.
बारामती उपविभाग),श्रीकांत पाटील(तहसिलदार इंदापूर) अप्पासाहेब जगदाळे (संचालक,पुणे जिल्हा म.सह.बँक), प्रविण माने (मा.सभापती.जि.प.बांधकाम वि),अंकीताताई शहा (मा.नगराध्यक्ष,न.प.इंदापूर), दिलीप पवार (वरिष्ठ पोलीस निरिक्षक इंदापूर),अभिजित तांबीले(मा.जि.प.स.) विजयकुमार परिट (गटविकास अधिकारी पं.स. इंदापूर), रामराजे कापरे (मुख्याधिकारी न.प.इंदापूर) हे उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक बांधीलकी आणि समाजसेवा म्हणून
निर्भिड व संयमपणे उन, वारा पाऊस, थंडीतही वेळेचे बंधन न पाळता रात्रंदिवस अपणापर्यंत बातम्यांचा अखंड स्त्रोत पोहचविण्याचे कार्य करणार्या सर्व पत्रकारांचा यथोचित सन्मान फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने होत आहे.
तसेच पत्रकार विशेष सन्मान म्हणुन प्रिंट मिडीया वार्ताहार तानाजी काळे(दै.लोकसत्ता),राजेंद्र कवडे-देशमुख (दै.पुढारी
), संतोष आटोळे(दै.सकाळ), सिद्धार्थ मखरे(दै.नवराष्ट्र), इले.मिडीया चॅनल नाविद पठाण (TV9), जितेंद्र जाधव( लोकमत 18 बारामती),मंगेश कचरे (साम TV), जयदिप
भगत (ABP माझा), नवनाथ बोरकर (जय महाराष्ट्र), विकास कोकरे ( लोकशाही न्युज), संदिप बल्लाळ (पुढारी)
वसंतराव मोरे (मुंबई तक) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधीलकी जपत आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविणारे सन्माननिय प्रकाश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक इंदापूर), एस.एस.करगळ (तलाठी इंदापूर ),प्रदिप पोळ (पोलीस पा. गोखळी), अंकुश बाळगाननुरे (उपजिल्हा रू. इंदापूर),अमोल मिसाळ (अध्यक्ष,इ.शहर आरपीआय),
कामिनी ठोकळे (महिला पो.पा. गिरवी) यांचा सन्मान होणार आहे.तर अलका ताटे(मा.नगराध्यक्ष न.प.इंदापूर),
बकुळा शेंडे (पुणे.जि.उपाध्यक्ष,अंगणवाडी से.सं.) आनिता खरात (अध्यक्ष,तेजपृथ्वी ग्रप), उमा इंगोले (अध्यक्ष,
इंदापूर शहर,रा.म.आ.),अॅड.रेश्मा गार्डे (इंदापूर),रेश्मा शेख (अध्यक्ष,इंदापूर श.म.आ.श.प.गट)याना महिला विशेष परस्काराने गौरविण्यात येणार असुन शेवटी स्नेहभोजन आयोजित केले आहे.तरी हीच निमंत्रण पत्रीका समजून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.