Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत सोरटेवाडी उपसरपंच पदी महेंद्र विठ्ठल शेंडकर यांची निवड

ग्रामपंचायत सोरटेवाडी उपसरपंच पदी महेंद्र विठ्ठल शेंडकर यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी महेंद्र विठ्ठल शेंडकर यांची निवड झाली ही निवड शुक्रवार दि ०५ रोजी  सोरटेवाडी सरपंच भारती सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली , अश्विनी कर्चे यांनी ठरल्या वेळेस  उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त  झालेल्या पदावर महेंद्र विठ्ठल शेंडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून   ग्रामसेविका ज्योती काळभोर यांनी कामकाज पाहिले.
  यावेळी नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री  सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक  संग्रामभाऊ सोरटे  ,श्रीपाल सोरटे ,अश्विनी  कर्चे मंदाकिनी सोरटे ,राणी खोमणे ,रणजीत सोरटे अर्चना मासाळ ,अमोल सोरटे, रणजीत सोरटे ,मधुकर सोरटे, नितीन सोरटे ,सोमनाथ देशमुख ,विलास पवार ,सुशांत सोरटे, तुकाराम  शेडकर ,शिवाजी पवार ,बाळासो क्षीरसागर ,बाळासो सोरटे ,शांताराम कर्चे, सुरज जाधव ,अभिषेक शेडकर ,विराज सावंत सह ब मान्यवर ग्रामस्थ सोरटेवाडी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test