स्तुत्य उपक्रम ! शेंडकरवाडी येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस वतीने हळदी कुंकू व महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
आरोग्य शिबिरास बहुसंख्य नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील शेंडकर वाडी येथे मकर संक्रांती निमित्त युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा प्रियांका राहूल शेंङकर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वनिताताई बनकर व औद्योगिक सेलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरण तसेच पुढील काळात करण्यात येणार्या योजना याबद्दल उपस्थितांना माहीती दिली.तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मागे खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस महीला अध्यक्षा वनिताताई बनकर यांनी सुप्रियाताई यांचे कार्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सुप्रियाताई यांनाच साथ द्या असे आवाहन केले. होळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ङाॅ शिंदे कर्नविर , वनिता सोरटे आरोग्य सेविका, गणेश कदम आरोग्य सेवक व कर्मचारी वर्गानी शिबीराचे उत्कृष्ट नियोजन केले होते.शेंङकरवाङीतील व सोमेश्वर परिसरातील महीला वर्गानी शिबिरास व हळदीकुंकू कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिशमामा खोमणे व करंजेपूल चे माजी सरपंच निवृत्ती शेंडकर ,युवती उपाध्यक्ष स्वप्नाली पवार, दिपालीताई पवार सदस्या महिला आघाडी ,नुसरत इनामदार कार्याध्यक्षा महिला आघाडी,सोनाली गायकवाड सरचिटणीस रा, काँग्रेस महीला आघाडी,अंकिता पवार सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, युवक उपाध्यक्ष प्रदीप शेंडकर, पुजाताई गायकवाड सरपंच ग्रामपंचायत करंजेपूल,कोमल गायकवाड सदस्या, नम्रता गायकवाड,अरूणा शेंङकर सदस्या, सोनाली गायकवाड सदस्या, निखिल शेंङकर सदस्य ग्रामपंचायत करंजेपूल तसेच उपस्थितीत मंङळींचे स्वागत प्रियांका शेंडकर यांनी व आभार राहुल निव्रत्ती शेंङकर यांनी मानले.या कार्यक्रमाला शेंङकरवाङीतील ग्रामस्थ महिला व युवक बहूसंख्येने उपस्थित होते.