Type Here to Get Search Results !

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा निमित्त शेंडकरवाडी झाली राममय...राम-लक्ष्मण, सीता, हनुमान ,शबरी तसेच वानरसेनेची केली होती बालगोपालांनी वेशभूषा

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा निमित्त शेंडकरवाडी झाली राममय...राम-लक्ष्मण, सीता, हनुमान तसेच  वानरसेनेची केली होती  बालगोपालांनी वेशभूषा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी करंजेपूल सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली असून त्यानिमित्त संपूर्ण भारतात गावा गावात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अनुशंगाने  शेंडकरवाडीत कार्यक्रम आयोजित केले होते.
 सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून मंदिरात भजन व प्रभू रामचंद्रांचे नामस्मरण  दिवसभर चालू होते,दुपारी १ वाजता महीलांचा हळदीकुंकू व ओवसण्याचा कार्यक्रम झाला तसेच संध्याकाळी ४ वाजता प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा निघाली त्यामध्ये  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता, हनुमान ,शबरी व वानर सेनेची वेशभूषा  बालगोपालांनी केली होती. शोभायात्रेचे स्वागतासाठी सर्वांनी आपापल्या दारासमोर सडा-रांगोळ्या काढल्या होत्या व 
 सर्वांच्या घरी पुरणपोळी बनवली होती तसेच  दारासमोर भगवीपताका उभी केल्या होत्या.
प्रभू रामचंद्रांच्या प्रती सेवाभावाने प्रत्येकाने कार्यक्रम शोभा वाढवण्यासाठी वाडीतील प्रत्येक कुटुंबाने एकत्रित उपस्थित रहात प्रभू रामचंद्र जयघोष केला त्यामुळेच शेंडकर वादी राममय झाली होतो हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय असल्याचा बोलताना ग्रामस्थांनी सांगितले.
 विशेष सहकार्य मुख्याध्यापक सतीश पिसाळ , अंगणवाडी सेविका रेश्मा शेंडकर, शारदा शेंडकर, पुष्पा शेंडकर, सुवर्णा शेंडकर, रेखा शेंडकर, सायली चोरगे, शालन शेंडकर, गंगाराम कामठे, साधुराम शेंडकर, सतीश शेंडकर, जालिंदर शेंडकर, राहुल शेंडकर, श्रीकांत शेंडकर,  व समस्त मान्यवर ग्रामस्थ होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test