Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

प्रजासत्ताक दिनी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
बारामती : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

उप विभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस, राष्ट्रीय छात्र सेना, नागरी संरक्षण दल, रस्ता सुरक्षा पथक, अग्निशमन दल यांचा समावेश होता. सर्व पथकांनी  संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

श्री. नावडकर  यांनी उपस्थित नागरिकांना  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली.

*प्रशासकीय भवन येथे राष्ट्रध्वजास मानवंदना*
तत्पूर्वी प्रशासकीय भवन येथील प्रांगणात तहसीलदार गणेश शिंदे यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी निवासी नायब तहसीललदार विलास करे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तहसील कार्यालय तसेच प्रशासकीय भवनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test