जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा सन २०२३/२४ संपन्न.
पाथरी / क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-1, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, तसेच परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न.
जी.एम.वस्तानवी उर्दू महाविद्यालय, पोखरणी रोड, पाथरी या ठिकाणी दिनांक 23 जानेवारी रोजी परभणी जिल्हा स्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या.
सदरील स्पर्धा 14 वर्षाखालील मुले मुली 17 वर्षाखालील मुले मुली तसेच 19 वर्षाखालील मुली या विविध वयोगटांमध्ये घेण्यात आल्या.
जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेचे उद्घाटन संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख खालिद फारुखी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच पद्धतीने उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेलू क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष सगीर फारुखी यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव शेख मुजीब, राज्य पंच श्रीनाथ कारकर, अर्जुन वाघमारे मानवतकर, सय्यद मोहसीन सर,एस डी बडे सर पाथरगव्हाण आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत घुंबरे यांनी तर आभार प्रदर्शन कृष्णा मोकाशी यांनी केले.
जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील मुलांच्या गटात मॉडर्न इंग्लिश स्कूल, सेलू या शाळेने प्रथम क्रमांक पटकावले. तर द्वितीय क्रमांक जी.एम. वस्तानवी उर्दू विद्यालय, पाथरी या शाळेने पटविले.
त्याच पद्धतीने सतरा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक जी एम वस्तानवी उर्दू विद्यालय पाथरी या संघाने मिळविले तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या संघाने मिळविले.
तसेच 19 वर्षातील मुलांच्या गटात नेताजी सुभाष विद्यालय पाथरी हा संघ प्रथम राहिला तर द्वितीय शांताबाई नखाते विद्यालय पाथरी हा संघ राहिला.
त्याच पद्धतीने मुलींच्या 14 वर्षाखालील गटामध्ये प्रथम मॉडेल इंग्लिश स्कूल, सेलू तर द्वितीय जिल्हा परिषद प्रशाला, मानवत व 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये प्रथम जी.एम वसतानवी उर्दू विद्यालय, पाथरी तर द्वितीय जिल्हा परिषद प्रशाला, मानवत. त्याच पद्धतीने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम शांताबाई नखाते विद्यालय, पाथरी द्वितीय नेताजी सुभाष विद्यालय, पाथरी या संघाने यश मिळवले.
प्रथम आलेले सर्व संघ विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
सर्व विजय संघाचे परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जुनेद खान दुर्राणी, महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी मॅडम व परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले.