करंजेतील जोशीवाडी शाळेतील कार्तिक पिंगळे उंचउडी मध्ये प्रथम तर त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.
सोमेश्वरनगर - यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२३/२४ बारामती तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा म.ए.सो.हायस्कूल बारामती येथे काल पार पडल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारामती तील करंजेतील जोशीवाडी या शाळेचा कार्तिक मोहन पिंगळे या विद्यार्थ्याने उंचउडी या क्रीडा प्रकारात तालुक्यात लहान गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.तसेच त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वांनी कौतुक केले.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण संपतराव गावडे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बारामती यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव,नवनाथ कुचेकर,सौ.मंगल आगवणे,माळवदकर मॅडम तसेच केंद्रप्रमुख रविंद्र तावरे,हनुमंत चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव व सहशिक्षक बापुसाहेब बालगुडे यांनी त्याला मार्गदर्शन केले.