सैनिक कल्याण विभागात माजी सैनिकांतून पदभरती
पुणे : सैनिक कल्याण विभागाच्या घोरपडी येथील कार्यालयात 'लिपिक टंकलेखक' पदे करार पद्धतीने भरण्यात येणार असून या पदासाठी माजी सैनिकांना २२ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्यासंबंधित विविध प्रकारच्या कामकाजाकरीता सैन्य सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर करण्यात येणार आहे. उमेदवाराकडे मराठी टंकलेखन वेग प्रती मिनीट किमान ३० शब्द व इंग्रजी टंकलेखनाचा वेग प्रती मिनीट किमान ३० किंवा ४० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे.
इच्छुक उमेदवारांनी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे-४११००१ येथे अर्ज करावा. अर्जासोबत सैन्य सेवेतील पीपीओ, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र व मराठी, इंग्रजी टंकलेखनाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडावी.
विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पत्राद्वारे, ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे, अशी माहिती सैनिक कल्याण विभागाचे राज्याचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड (निवृत्त) यांनी केले आहे.