सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या ज्ञानदा शिंदेची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु स्पर्धेमध्ये शिंदे ज्ञानदा मोहन (१२वी विज्ञान) या खेळाडू विद्यार्थिनीने १९वर्ष वयोगट, ६५किलो वजनगटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. २३ते २८ जानेवारी रोजी झालेल्या झारखंड-रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत तिने बाँझ पदक प्राप्त केले.यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे- देशमुख, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा. सुजाता भोईटे मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर, संस्थेचे सचिव सतीश लकडे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ.प्रवीण ताटे- देशमुख, डॉ.जया कदम मॅडम, आय क्यू सी समन्वय डॉ. संजू जाधव उपप्राचार्य प्रा रविंद्र जगताप पर्यवेक्षिका प्रा. जयश्री सणस मॅडम यांनी अभिनंदन केले. पुढील झारखंड- रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थिनीला प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. दत्तराज जगताप, तुषार मोहिते यांनी मार्गदर्शन केले.