करंजेपुल दुरक्षेत्र कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर - ७५ व्या प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील प्रमुख राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण देशभरात २६ जानेवारी हा जोरदार साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्य, अखंडतेचे प्रतीक आहे.शाळांमध्ये ,महाविद्यालय तसेच सहकार विविध संस्था तसेच प्रशासकिय आणि खाजगी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिन साजरा करत असतात.
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र येथे करंजेपुल दुरक्षेत्र कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार दि २६ जानेवारी रोजी सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम ध्वज फडकवत करण्यात आले यावेळी करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक पांडुरंग कान्हेरे,वडगाव निंबाळकर पोलीस निरीक्षक समाधान लवटे,करंजेपुल उपनिरीक्षक दीपक वारुळे, हवालदार अमोल भोसले ,पोलीस नाईक कुंडलिक कडवले सह इतर पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.