Type Here to Get Search Results !

करंजेतील जोशीवाडी शाळेत चिमुकल्यांचा आनंद बाजार संपन्न.

करंजेतील जोशीवाडी शाळेत चिमुकल्यांचा आनंद बाजार संपन्न.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेतील जोशीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आनंद बाजार व खाऊ गल्लीचे आयोजन केले होते.या बाजारात चिमुकल्यांची ५ हजार रुपयांची उलाढाल झाली.
   या आनंद बाजाराचा शुभारंभ करंजे सरपंच भाऊसो हुंबरे व बाळासाहेब शिंदे संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती निरा  यांच्या हस्ते करण्यात आला.
 विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी व त्यांना दैनंदिन व्यवहारातील ज्ञान अवगत व्हावे,यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या बाजारात विविध पालेभाज्या,फळभाज्या, कडधान्ये,खाद्यपदार्थ व शालेय स्टेशनरी विक्रीसाठी आणले होते.
     यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू दगडे,सौ मंगल गोरे तसेच ग्रामस्थ,पालक व युवक वर्ग उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा जाधव व सहशिक्षक बापुसाहेब बालगुडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test