जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थाकडून केक कापत नविन वर्षाचे स्वागत.
बारामती - वडगांव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक येथे शालेय विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षकांना कोणतीही पुर्वकल्पना न देता नवीन वर्षाचे स्वागत करायचे ठरवले व त्यातील ठराविक मुलांनी एकत्र येत खाऊचे पैसे जमा करून केक आणले, फटाके आणले व शिक्षिकांना वर्गात बोलावून वाढदिवसाला जसे फटाके फोडतात त्या पद्धतीने फटाके फोडत एका वेगळ्या पद्धतीने नविन वर्षाचे स्वागत केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अरूणा आगम सौ.सुरेखा पाटील मगदूम मॅडम सौ.मालन बोडरे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष सुशीलकुमार अडागळे उपस्थित होते.
"या वयात आम्ही मुले एकत्र येऊन एखादे कार्य पार पाडू शकतो व एकजुटीने कार्य होऊ शकतात अशी भावना मुलांमध्ये या निमित्ताने दिसून आली".