जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री शहाजी विद्यालयाचे यश.
बारामती :पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे या संस्थेच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून जिल्ह्यास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.यावर्षी संस्थेने 9 गटामध्ये शाखांची विभागणी करून स्पर्धेचे आयोजन केले.
नुकत्याच अण्णासाहेब मगर महाविद्यालय,हडपसर येथे बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या.त्यामध्ये श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे ची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बापू कुतवळ या विद्यार्थिनीने 17 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला.नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थीनीने सुवर्णपदक पटकाविले आहे.
तसेच कै.तुकाराम धोंडिबा पठारे महाविद्यालय,खराडी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत 17 वर्षे वयोगटामध्ये कुतवळ संग्राम राजेंद्र याने 92 किलो वजन गटामध्ये 'द्वितीय' तर 17 वर्षे वयोगटामध्ये रेवडे सार्थक विठ्ठल या विद्यार्थ्याने 48 किलो वजन गटामध्ये 'द्वितीय क्रमांक' मिळविला.
तसेच वाघिरे महाविद्यालय,सासवड येथे झालेल्या जिल्हा स्पर्धेत श्री शहाजी हायस्कूल,सुपे या विद्यालयातील 19 वर्षे खो-खो मुलींच्या संघाने संस्थेत 'प्रथम क्रमांक' पटकाविला.तसेच 19 वर्षे मुलांच्या संघाने संस्थेत 'द्वितीय क्रमांक' मिळविला.
वाघिरे महाविद्यालय येथे अॅथलेटिक्स स्पर्धा संपन्न झाल्या.यामध्ये गोळाफेक या क्रीडाप्रकारामध्ये कुतवळ संग्राम राजेंद्र याने 17 वर्षे वयोगटात 'द्वितीय क्रमांक' पटकाविला तर भोंडवे संस्कार प्रकाश याने 19 वर्षे वयोगटात 'प्रथम क्रमांक' मिळविला.जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये उपशिक्षिका सौ.के.के.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थीनींनी सुंदर नृत्य सादर केले.
त्याचप्रमाणे राज्यांतील शाळांमध्ये एक तास वाचनाचा ठेवण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महावाचन अभियान (महाराष्ट्र वाचन चळवळ)उपक्रम जाहीर केला आहे.त्या उपक्रमाच्या अनुषंगाने श्री शहाजी विद्यालयात महावाचन अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.
क्रीडा स्पर्धांमधील सर्व खेळाडूंना क्रीडाविभागप्रमुख श्री.आर.बी.दुर्गे आणि क्रीडाशिक्षक श्री.पी.पी.शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य सौ.एस.ए लोणकर,पर्यवेक्षक श्री.बी.के.भालेराव,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.