सिद्धिराजनाथ ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. सोरटेवाडी चा २१ वा वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे असणारी सिद्धिराजनाथ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या. सोरटेवाडी या संस्थेचा २१ वा वर्धापन दिन तसेच दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शनिवार दि १३ रोजी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सदर सोहळा प्रसंगी बारामती तालुक्यातील सहकार,राजकीय, सामाजिक,शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी पदाधिकारी सह सिद्धिराजनाथ पतसंस्थाचे कर्जदार,ठेवीदार, सभासद बंधू सर्व विद्यमान संचालक मंडळ तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गेली २१ वर्ष सिद्धिराजनाथ पतसंस्थेवर जो विश्वास कर्जदार,ठेवीदार,सभासद बंधू यांनी ठेवला आहे तो पुढील काळात ठेवतील असा विश्वास संस्थापक अध्यक्ष तानाजी सोरटे यांनी आपले मत व्यक्त करत उपस्थित सर्व मन्यावरचे आभार मानले .