निधन वार्ता ! बारामती येथील सुप्रसिद्ध सराफ व्यवसायिक शांतीशेठ शहा सराफ यांचे अल्पशा आजाराने निधन
बारामती प्रतिनिधी (दिगंबर पडकर ) -.. बारामती येथील सुप्रसिद्ध सराफ व्यवसायिक शांतीशेठ शहा सराफ यांचे शुक्रवारी दि १२ रोजी दुपारी ३ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्रात विशेषता पुणे जिल्ह्यात शांतीशेठ शहा सराफ हे सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक म्हणून सर्वांना परिचित होते.बारामती सराफ असोसिएशनचे ते मार्गदर्शक होते. शांतिशेठ शहा सराफ हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते.सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपुलकीने, प्रेमाने बोलत असत.असंख्य ग्राहकांना त्यांच्या जाण्याची बातमी समजल्यावर त्यांनाही गहिवरून आले. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर व बारामती परिसरात दुःखाची छाया पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून अशोकनगर येथून उद्या शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता निघेल.