Sports जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रथम क्रमांक एस. एम. के. आर्टस्, सायन्स, अँड कॉमर्स कॉलेज गिरणारे व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल उपविजयी वैनतेय विद्यालय निफाड तृतीय क्रमांक
नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षा आतील जुनिअर टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी ,महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड सहसचिव धनंजय लोखंडे ,विलास गिरी, व क्रीडा शिक्षक इत्यादी उपस्थित होते नाशिक सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी निफाड, नाशिक ,दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, या तालुक्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक :एस. एम. के. आर्टस्, सायन्स, अँड कॉमर्स कॉलेज गिरणारे ता. देवळा जि. नाशिक .,द्वितीय क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक ,तृतीय क्रमांक /-वैनतेय विद्यालय निफाड व मुलींमध्ये प्रथम क्रमांक : ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक ,द्वितीय क्रमांक .क्रीडा सह्याद्री निफाड यांनी मिळाल्याबद्दल यांचे अभिनंदन होत आहे .या निवडचाचणीतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू 17 ते 20 डिसेंबर 2023 रोजी नाशिक इथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे या स्पर्धेत धनंजय लोखंडे ,विजय घोटेकर ,संत्यम पाडे ,योगिता महाजन, ,,दिपक पाटिल यांनी पंच म्हणून काम केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड परिश्रम घेतले .