पुरंदर तालुक्यातील जेजुरी मोरगाव रोड येथील तीन दुकानात अज्ञात चोरट्यांनी फोडली असून तेथील रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी रविंद्र नारायण चौधरी (वय 35 वर्षे) रा. जेजुरी वेताळनगर ता. पुरंदर यांनी अज्ञात चोरटा यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २५ रोजी मोरगाव रोड येथील लोकसेवा हार्डवेअर अँड मशनरी दुकानाचे शटर चे सेंटर लॉक न तोडता बाजूचे लॉक तोडून पत्रा उचकटून चोरांनी दुकानात प्रवेश करून ड्रावर मधील रोख रक्कम १८ हजार रुपये चोरीला नेल्याची घटना असून त्याचप्रमाणे जय किसान मिल्किंग अँड ऍग्रो सर्विस दुकानातील रोख ५ हजार रुपये रक्कम तसेच एसी फ्लाय हार्डवेअर दुकानातील रोख २ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली आहे.