अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण ठार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे शिवारात अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने हरिण जागीच ठार झाले ,रविवार पहाटे च्या सुमारास सोमेश्वर मंदिर डांबरी रस्त्यावर दत्त मंदिर येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ते हरीण चारा,पाण्याच्या शोधार्थ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने हरिणाला जोराची धडक दिली. हरिणाच्या तोंडाला जबर मार व धडापासून ते बाजूला तुटून पडले व जागीच त्याचा मृत्यू झाला , मृत्यू हरणाची अवस्था पाहता ते कोणत्याही प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेलं नसून ते वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेने मृत झाले असल्याची महती प्रथम दर्शनी पहाटे व्यायाम करण्यासाठी जाणाऱ्या युवकांनी दिली.
संबधीत वनविभाग अधिकारी यांनी त्वरित माहिती घेत पाहणी करावी.