खंडाळा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा.
" शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे शौचालय कुलुप बंद तिजोरीत तर नागरिक मात्र उघड्यावर, महिलांची होतेय मोठी गैरसोय.."
खंडाळा तहसीलदार कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समिती खंडाळा आदी तालुका प्रशासकीय कार्यालयांत नागरिक बहुसंख्येने विविध शासकीय कामकाजासाठी ये जा करित असतात. नागरिकांना विविध कार्यालयांत काम पुर्तता होई पर्यंत थांबावे लागते अशातच लघुशंका व शौचालयाचा वापर करण्यासाठी धाव घ्यावी लागते. परंतु प्रशासकीय कार्यालयांतील मुतारी व शौचालयात अस्वच्छता व घानीचे साम्राज्य पाहुन नागरिकांची माथे भडकत आहेत. तालुका प्रशासकीय कार्यालयांतच अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरलेली अशी अवस्था पाहून प्रशासकीय यंत्रणा तालुक्यात काय व कशी “ स्वच्छ भारत योजना “ राबविणार…? असा संतप्त प्रश्न निर्माण होतो आहे.
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वापरासाठी कुलुप बंद तिजोरीतील शौचालय असुन त्यांना या अस्वच्छतेची झळ बसत नसल्याने येथील सार्वजनिक मुतारी व शौचालयांत दुर्लक्ष झाले आहे. येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
खंडाळा तालुक्याच्या प्रशासकीय कार्यालयांतील व आवारातील विविध प्रकारचे शासकीय कार्यालयांच्या ठिकाणच्या सर्व मुतारी व शौचालयांतील अस्वच्छता व घानीचे साम्राज्य नष्ट करुन सातत्याने स्वच्छता राखावी व निर्जंतुकिकरण औषधांची फवारणी करावी तसेच हँन्डवाॅश सह पाणी उपलब्धता करुन प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी या लोकसेवकांची वेगळी व जनतेची वेगळी अशी व्यवस्था बंद करून एकत्र वापराची सार्वजनिक शौचालय व मुतारी या ठिकाणी कार्यान्वित करावी. “ ऐक कदम स्वच्छता की ओर “ या ब्रिद वाक्यास अनुसरण खंडाळा तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मा. तहसीलदार खंडाळा यांनी सदर गैरसोय दुर करुन “ स्वच्छ भारत अभियान “ प्रथम तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयांत राबवुन नागरिकांची होणारी समस्या दुर करावी. अशा विनंती मागणीचे निवेदन साथ प्रतिष्ठाण चे वतीने खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांना साथ प्रतिष्ठाण अध्यक्ष कय्युम मुल्ला, उपाध्यक्ष दिपक बाटे, कार्यकारिणी सदस्य सुनील रासकर यांनी दिले आहे.