बारामती ! विद्या प्रतिष्ठानचा ‘उडान हौंसलौं की' कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.
बारामती प्रतिनिधी
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी, बारामती. या ४ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि ‘उडान हौंसलौं की…’ हा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी गदिमा सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिथयश कायदे तज्ज्ञ आणि विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष मा. अॅड.अशोकराव प्रभुणे सर उपस्थित होते. त्यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे कौतुक करुन शाबासकी दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. प्रभुणे सर म्हणाले की, “डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेल्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करा. उत्तुंग यश प्राप्तीसाठी झोपेत स्वप्न न पाहता; झोप उडवणारे स्वप्न पाहून ध्येय गाठा.” असा अमूल्य संदेश त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव मा. अॅड. नीलिमाताई गुजर, संस्थेचे सदस्य डॉ. राजीव शहा, विद्यालयाला नेहमी मार्गदर्शन करणार्या सौ. माधवी गोडबोले, पालक संघटनेच्या उपाध्यक्षा सौ. सुजाता पवार, सहसचिव सौ.गौरी देव आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या प्राचार्या सौ.तनुश्री गोरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण झाल्यानंतर "उडान हौंसलौं की..." हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला. प्रस्तुत कार्यक्रमात सुमारे ६००विद्यार्थ्यांनी अभिनय, नृत्य, गायन, वादन असे कलाकौशल्य प्रदर्शित करुन प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली.प्राचार्य तनुश्री गोरे, तसेचलीला शेट्टी, माधुरी दिक्षित रुपाली सावरे,फरिदा नबाब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे नेपथ्य व सुशोभिकरण सचिन कुंभार आणि वृषाली साबळे यांनी केले; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मदने आणि नरेंद्र बळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यालय गीत आणि राष्ट्रगीताने झाली.