सोमेश्वरनगर ! टावर आहे नावाला... रेंज नाही गावाला; मोबाईलधारक त्रस्त
सोमेश्वरनगर - महिन्यांपासून बारामती तील सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील अनेक भागात नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करत आहे. परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट केलाय. त्या देखील मोबाईल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व्यापारी व शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. संबंधित मोबाइल कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड किंवा सुरळीत करण्यासाठी असणाऱ्या उपाय योजना आखण्यात कडे लक्ष देत लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी सोमेश्वर परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहेत.
बारामती तील सोमेश्वर परिसर हा शिक्षण संकुलन ,सोमेश्वर साखर कारखाना , मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ,सहकारी तसेच नॅशनलाईज बँक , पतसंस्था , दूध संस्था तसेच हॉटेल व छोटे मोठे असंख्य व्यावसाईक या भागात आहेत त्यामुळे सोमेश्वर नगर ही मुख्य बाजारपेठ बनलेले आहे , मोबाईल नेटवर्क मनोऱ्यावर विविध कंपन्यांचे च्या छत्र्या आहेत.जिओ कंपन्यांची उत्कृष्ट मोबाईल सेवा मिळत असल्याने व चांगली इंटरनेट सर्व्हिस मिळत असल्याने बहुतांश लोकांनी नवीन सिमकार्ड तसेच काही कंपन्यांचे या मध्ये परिवर्तित करून घेतले. परंतु मागील काही महिन्यापासून ग्राहकांचे वांधे करून ठेवले आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले.परंतु त्याचा फायदा नसल्याचे दिसून येते.टावर आहे नावाला... रेंज नाही गावाला असे नागरिकांकडून म्हणणे पुढे आले आहे.
मोबाईल रेंज चा प्रादुर्भाव असल्याने ग्राहक आणि व्यावसायिक यामध्ये काहीसा वादानुभव मतभेद होत आहेत, अत्याधुनिक युग असल्याने प्रत्येक व्यावसायिक गुगल पे ...फोन पे चा स्कॅनर चा वापर करताना दिसत आहे ... रेंज प्रॉब्लेम मुळे रक्कम जाण्यास वेळ लागतो किंवा काही वेळेस जातही नाही त्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिक नाते बिघडत तर याचा व्यावसायिकावरही परिणाम होत असल्याचे एका व्यवसायिकांनी सांगितले.