सोमेश्वरनगर - माजी राज्यमंत्री व शिवसेना उपनेते विजयबापू शिवतरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर मधील निरा व बारामतीतील सोमेश्वर येथे रक्तदान,शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप,एकल पालक योजने अंतर्गत प्रतिमहा २ हजार २०० रुपये योजनेचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे,शिवसेना बारमती तालुका अध्यक्ष स्वप्निल जगताप,रविराज जगताप,उदय निगडे,संकेत जगताप,राजेंद्र शेळके,केतन निगडे,सुरज जगताप,विराज जगताप,संग्राम जगताप अदी मान्यवर उपस्थित होते.