सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांना “सर्वोत्कृष्ट दोषसिद्ध” पुरस्काराने सन्मानित.
बारामती - बारामती तालुक्यातील सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांना पुणे ग्रामीण पोलिस दलातर्फे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या शुभहस्ते'सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पाटील यांनी विविध दाखल गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास केल्याने आरोपींचा दोषसिद्ध झाला असल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
सदर पुरस्कार सोहळा कार्यक्रम शुक्रवार दि. १५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे संपन्न झालेल्या गुन्हे शाखेच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला
पाटील हे सध्या सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
सदर कामगिरी बद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नागनाथ पाटील यांचे अभिनंदन केले व भविष्यातही अशीच कामगिरी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सहाय्यक पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (बारामती विभाग) ,सहाय्यक पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (पुणे विभाग) यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.