Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
      
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने बारामती क्रीडा संकुल माळेगाव येथे संपन्न झालेल्या शालेय  तायक्वांदो स्पर्धेमध्ये  पृथ्वीराज दीपक ढमाळ(१२वी वाणिज्य) या खेळाडू विद्यार्थ्याने १९वर्ष वयोगट, ६३किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. पुणे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा. सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, प्रा.महेंद्रसिंह जाधवराव, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा. सुजाता भोईटे मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर, संस्थेचे सचिव सतीश लकडे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ.प्रवीण ताटे- देशमुख, डॉ.जया कदम मॅडम, आयक्यूएसी समन्वय डॉ. संजू जाधव उपप्राचार्य प्रा रविंद्र जगताप पर्यवेक्षिका प्रा. जयश्री सणस मॅडम यांनी अभिनंदन केले. पुढील पुणे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test