सोमेश्वरनगर ! झाडांच्या फांद्या ठरताय ऊस वाहतूकिस अडथळा ; रस्त्यावर रोज पडतोय ऊसाचा सडा..
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल हद्दीत सोमेश्वर मंदिर रस्ता लगत झाडांच्या फांद्या ठरताय ऊस वाहतूक करण्यासाठी अडथळा सध्या सोमेश्वर चा या वर्षीचा गळीत हंगाम चालू असून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर ऊस कांड्या भरलेले जात असते या फांद्याला ऊस धडकल्याने अनेक ऊस कांड्या रस्त्यावर फुलांचा सडा पडल्यासारख्या पडलेल्या पाहायला मिळतात यामुळे शेतकऱ्यांना नाहक नुकसान माती पडत आहे अगोदरच पावसाची कमतरता असल्यामुळे ऊस कसाबसा आणला आहे त्यामध्ये असे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी करायचे काय असाही प्रश्न मनात गोंगावत आहे ,सोमेश्वर नगर परिसरात बऱ्याच ठिकाणी झाडांच्या अडथळा करणाऱ्या फांद्या सार्वजानिक बांधकाम विभाग त्वरित काढाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनकडून होत आहे. कारखाना प्रशासनाने याकडे अधोगरच लक्ष देणे अपेक्षित होते असेही काही ऊस उत्पादक शेतकरी यांनी बोलताना सांगितले .