सुपा पोलीस ठाणे अंतर्गत रूट मार्च तसेच मराठा व ओबीसी आरक्षण अनुषंगाने कायदा सुव्यवस्था बाबत शांतता कमिटी स्थापन.
सुपा - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील बुधवार दि २० रोजी सकाळी ११ वाजता सुमारास शांतता कमिटीची मीटिंग घेऊन पोलीस स्टेशन स्तरावर शांतता कमिटी स्थापन करण्यात आली.सदर मीटिंगमध्ये सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी उपस्थित मान्यवरांना मराठा व ओबीसी आरक्षण अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बाबत उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले.
तसेच सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा रूट मार्च दंगाकाबू रंगीत तालीम घेण्यात आली, त्यानंतर शहाजी स्कूल सुपा ते भुईकोट किल्ला मैदान मार्गे मेन बाजारपेठेतून डायमंड चौक या मार्गे रूट मार्च घेण्यात आला सदर वेळी १ पोलीस अधिकारी १० पोलीस अंमलदार आणि ३ महिला पोलिस अंमलदार हजर होते.