स्वयंभू पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन व दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन कार्यक्रम संपन्न
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील स्वयंभू ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. सोरटेवाडी चा पाचवा वर्धापन दिन व दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कमी कालावधी संस्थेची कारकीर्द , विशेष उंचीवर कार्यरत असलेली स्वयंभू ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था चा पाचवा वर्धापन दिनाच्या निमित्त पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना प्रमुख उपस्थिती सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप , बारामती तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर ,राजहंस पतसंस्था व्यवस्थापक विजुभाऊ सोरटे, चेअरमन मधुकर सोरटे,सोमेश्वर संचालक प्रवीण कांबळे, निरा खरेदी विक्री संचालक बाळासाहेब शिंदे ,सोमेश्वर माजी संचालक विशाल गायकवाड, माजी कार्याकारी संचालक बाळासाहेब गायकवाड ,माजी सरपंच वैभव गायकवाड , पै. विकास जाधव ,उपस्थिती होते.
तसेच स्वयंभू पतसंस्था चेअरमन शिवाजीराव सोरटे , व्हॉइस चेअरमन विठ्ठल गडदे , सचिव मोहन सोरटे सह संचालक मंडळ तसेच कर्मचारी वृंद व संस्थेचा सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व संस्था सभासदांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.