सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील 'मनशक्ती प्रयोग केंद्रा मार्फत' मार्गदर्शन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व बारावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील 'मनशक्ती प्रयोग केंद्रामार्फत' 'परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी' मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मा. मनीष शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते, यावेळी संस्थेचे सचिव सतीशराव लकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप, व्यवस्थापन समितीच्या सदस्या.सुजाता भोईटे, मनशक्ती केंद्राचे साधक स्वप्ना चौधरी, अनिल पिंपरकर व अन्य साधक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मा. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना विविध मानसशास्त्रीय प्रयोगाद्वारे यश संपादन करण्यासाठीच्या सात गोष्टींची माहिती दिली व या गोष्टी आत्मसात केल्यानंतर यश प्राप्तीसाठी या गोष्टी खूप अनुकूल आहेत असे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले. तसेच अभ्यासात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी बुद्धीवर्धन पद्धत, सारांश पद्धत, समजावून सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना मनशांती साठी विविध प्रात्यक्षिके सादर करून घेतले. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी मनशक्तीसाठी शैव व वैष्णव यांचे दाखले देऊन मन:शांती करण्याबाबत आपल्या अध्यात्मात सुद्धा सांगितलेली आहे हे विचार मांडले तसेच वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांनी इंद्रियावर ताबा मिळवल्यानंतर जीवन अधिक सुखकर होते हे सांगितले.तसेच वेगवेगळे दाखले देत मन:शांती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दुःखाचे मूळ कारण तॄष्णा आहे असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.जे. एन. खोमणे यांनी केले,तर आभार प्रा.आर.ई होळकर यांनी मानले.