सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत करंजे अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन सोहळा शुक्रवार दि ८ रोजी आयोजित करण्यात आला होता .हा कार्यक्रम सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच भाउसो हुंबरे, उपसरपंच सचिन पवार, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, सदस्य महेंद्र पाटोळे,विष्णू दगडे, अशोक होळकर, सदस्या मयुरी प्रताप गायकवाड,मंगल गोरे, रुपाली शिंदे ,अफसाना मुलाणी,खुर्शीदा मुलाणी तसेच करंजे देऊळवाडी गावातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भमिपूजन संपन्न झाले.
यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ६७००० लिटर उंच पाण्याची टाकी बांधणे, मरीमाता मंदिर उद्यान सुशोभीकरण करणे, करंजे गावठाण अंतर्गत भूमिगत गटर करणे, करंजे गावठाण अंतर्गत रस्ता करणे, करंजे अंतर्गत बागेच्या मळयाकडे जाणाऱ्या ओढ्यावर पुल बांधणे, करंजे देऊळवाडी अंतर्गत रस्ता करणे, करंजे माळवाडी अंतर्गत स्मशानभूमी शेड बांधणे ही कामे होणार असल्याचे बोलताना सरपंच भाऊसो हुंबरे व ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर यांनी सांगितले