राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट) पक्ष ज्येष्ठ नागरिक सेल पुणे शहर अध्यक्ष पदी बसंतकुमार भाटिया
दिगंबर पडकर,बारामती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर( शरद पवार गट) ज्येष्ठ नागरिक सेल पुणे शहर अध्यक्षपदी बसंतकुमार भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पत्र शनिवार दि २ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते मोदी बाग कार्यालय पुणे येथे बसंतकुमार भाटिया यांना प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी प्रशांतदादा जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व प्रदेश प्रवक्ता माजी महापौर माननीय अंकुशराव काकडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले , बसंतकुमार भाटिया यांच्या नियुक्तीचे स्वागत संपूर्ण पुणे शहरातील सर्व मान्यवर संस्था व व्यक्तीं द्वारा संपूर्ण राजकीय क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे