सोमेश्वरनगर ! अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाची सोमेश्वर पंचंक्रोशीमध्ये सकल हिंदु समाजाकडून शोभायात्रा.
सोमेश्वरनगर - श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाची सोमेश्वर पंचंक्रोशीमध्ये सकल हिंदु समाजाकडून शोभायात्रा.या अक्षदांद्वारो देशातील प्रत्येक गावात घरोघरी श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण मंदीर समीती अयोध्या यांचेकडून देण्यात येणार आहे.दि.१ ते १५ जानेवारी दरम्यान या अक्षदा घरोघरी पोहचवण्याचं काम केलं जाईल.तसेच या अक्षदा आपल्या देवघरात ठेऊन त्या २२ जानेवारी रोजी आपल्या जवळील मंदीरात राम नाम जप करून लोकांनी वहायच्या आहेत.या शोभायात्रे प्रसंगी संग्राम जगताप,बबलू सकुंडे,सुजीत सावंत,प्रमोद खराडे,नवनाथ महानवर,संभाजीराव भुजबळ,होळकर आण्णा,हेमंत जाधव व सर्व हिंदु युवक बहुसंख्येने उपस्थित होते.