सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड.
सोमेश्वरनगर - विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो या क्रीडा प्रकारात विविध वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
यामध्ये इयत्ता ७ वी मधील ईश्वरी निगडे हिने १४ वर्षाखालील ३६ किलो वजन गटातून सुवर्णपदक मिळवले. तर इयत्ता ९ मधील आर्या निगडे व कृतिका घाटे हिने १७ वर्षाखाली एकूण ४९ ते ५३ किलो वजन गटातून सुवर्णपदक मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर स्पर्धा माळेगाव क्रीडा संकुल माळेगाव येथे दिनांक ०६/ १२/ २०२३ रोजी घेण्यात आली होती.या स्पर्धेसाठी बारामती तालुक्यातील विविध शाळेचे स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळांनी केले.