राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये गोवा संघाला प्रथम क्रमांक व महाराष्ट्र संघ उपविजेता
(मुंबई मुलाचा संघाला तिसरा क्रमांक)
टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोशिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाचवी राष्ट्रीय सब जुनिअर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा नाशिक
येथील म्हसरूळ क्रिकेट मैदान येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये
गोवा संघ प्रथम क्रमांक महाराष्ट्र संघ उपविजेता तर मुंबई संघाला तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व जिल्ह्यातून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, भारतीय सचिव मिनाक्षी गिरी ,महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,गोवा सचिव पंकज सावंत
नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी.महेश मिष्रा,सदिप पाटील,विजय बिराजदार
आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मिनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व त्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून मुलांचे 11संघ उपस्थित होते. टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गोवा विरुद्ध महाराष्ट्र असा झाला. यामध्ये .गोवा च्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे कामगिरी करत संघाला विजयश्री मिळवून दिला व महाराष्ट्र संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. या स्पर्धेमध्ये नाशिकचा
सत्यम पांडे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले
त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट फलंदाज ओमकार गोवा आणि मालिकावीर लोकेश मराठे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद व मुंबई मुलाच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट च्या महासचिव मिनाक्षी गिरी, ,महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे ,विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून भूषण गावकर, ओमकार पवार,दर्शन थोरात, लखन देशमुख, सुमन गौडा यांनी पंच म्हणून काम केले
तसेच संघाच्या मार्गदर्शक म्हणून , महेश मिक्षा महाराष्ट्र मार्गदर्शक व मुंबई मार्गदर्शक सिद्धेश गुरव या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.