माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्ड शिबिर;शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
बारामती प्रतिनिधी - माजी केंद्रीय कृषिमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तांदूळवाडी व परिसरातील नागरिकांसाठी आज गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर व शुक्रवार 1 डिसेंबर रोजी 2 दिवसीय आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे शिबिर बेलदार पाटील चौक तांदूळवाडी बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी 500 च्या जवळपास कार्ड काढण्यात आले आहेत. दरम्यान दिवसभर सुरू असणाऱ्या या शिबिरास 1000 हून अधिक नागरिकांनी भेट दिल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता हे शिबिर तीन दिवसाचे करण्याचा आमचा मानस आहे. दरम्यान कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये, तळागाळातील लोकांना याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे. असेही आयोजक ऍड बळवंत भगवान बेलदार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ बळवंत पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य जयश्री जगदाळे (बा न प), कृष्णा गायकवाड पोस्ट ऑफिस बारामती, लक्ष्मीप्रभा करे (आशा सुपरवायझर), तसेच आशा स्वयंसेविका अश्विनी कावरे, सारिका मलगुंडे, नीलम जाधव, स्वाती बनसोडे, सुमन लोंढे , स्वाती शिर्के, लता पवार, संध्या भोईटे, प्रितांजली एखंडे, नयन गेगजे, रूपाली भोसले यांनी सहकार्य केले.