मराठा आरक्षण आंदोलन व कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन अनुषंगाने वडगाव निंबाळकर हद्दीत रूठ मार्च
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत शनिवार दि २३ रोजी सकाळी १०:३०ते १२ वाजता आगामी मराठा आरक्षण आंदोलन, तसेच १ जानेवारी कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वतीने कोऱ्हाळे बु!!, वडगाव निंबाळकर, करंजेपुल या गावात पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील गावात शांतता प्रस्थापित रहावी या उद्देशाने सदरचे पथसंचलन काढण्यात आले,
सदर पथसंचलना मध्ये / रूठ मार्च मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे सह २० पोलीस अंमलदार, व ४ होमगार्ड तसेच २ सरकारी वाहन यांचा सदर पथसंचलना मध्ये समावेश करण्यात आला होता.