भारतीय पत्रकार संघ वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्य व पोलिस यांचा सत्कार समारंभ संपन्न
तालुका पदाधिकारी यांना ओळख पत्र वाटप ; जागतिक अपंग दिन साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे ग्रामपंचायत कार्यालयात येथे रविवार दि ३ रोजी चोवीस राज्यात सक्रिय असलेल्या भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका वतीने पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे करंजे येथील सरपंच भाऊसो हुंबरे
होते तसेच नवनिर्वाचित उपसरपंच सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटोळे, मयुरी गायकवाड, अफसाना मुलाणी खुर्शिदा मुलाणी,महेंद्र पाटोळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड ,पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे तसेच
करंजेपूल नवनिर्वाचित सरपंच पुजाताई वैभव गायकवाड, उपसरपंच शेखर(सर) गायकवाड,चौधरवाडीचे सरपंच शशिकांत पवार,मगरवाडी सरपंच विनिता हगवणे,मुर्टी सरपंच कोमलताई जगताप, उपसरपंच, सायंबाचीवाडी सरपंच जालिंदर भापकर ,उपसरपंच हनुमंत बांदल वाकीचे सरपंच बोडरे , उपसरपंच इंद्रजित जगताप यांचा सत्कार भारतीय पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड कैलासजी पठारे, अॅड पांडुरंग ढोरे पाटील, अॅड योगेश जी तुपे, विभागीय अध्यक्ष सिकंदरजी नदाफ, पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुरभाई शेख पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे ,बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे तसेच सचिव सुशिलकुमार अडागळे यांच्या शुभ हस्ते शुभेच्छा त्यांचा शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला.
विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी आपल्या मनोगतात उपस्थित नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना सर्व सोशल मीडिया प्रिंट मीडिया पत्रकार बांधवांना आपल्या माध्यमातून जाहिरात स्वरूपात मदत करावी असेही आव्हान करण्यात आले हे आवाहन करताना ते आपले सतत बातमी प्रसिद्ध करत असतात या अनुषंगाने ते बोलत होते तसेच पोलीस प्रशासनान वतीने वडगाव निंबाळक अंकित करंजेपूल दूरक्षेत्राचे कणेरी साहेब व नागटिळक साहेब हे उपस्थित होते त्यांचाही सत्कार भारतीय पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना पीएसआय कनेरी यांनी सध्याची चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सोमेश्वर पंचक्रोशीतील उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच व सदस्यांनी पोलीस प्रशासनांना मदत करत सहकार्य करावे असेही नम्र आवाहन केले व आयोजित भारतीय पत्रकार संघ सत्कार समारंभांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांनी पत्रकार कसा असावा यावर याविषयी योग्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सुशील कुमार अडागळे तर प्रस्ताविक मधुकर बनसोडे यांनी केले आभार तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे यांनी केले
प्रमुख उपस्थिती भारतीय पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड कैलासजी पठारे, अॅड पांडुरंग ढोरे पाटील, अॅड योगेश जी तुपे, विभागीय अध्यक्ष सिकंदरजी नदाफ, पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुरभाई शेख पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे हे उपस्थित होते.तसेच भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक अध्यक्ष विनोद दिलीप गोलांडे,उपाध्यक्ष शंतनु सोपानराव साळवे ,सचिव सुशिलकुमार विलास अडागळे,संघटक महंमद मुसाभाई शेख,हल्ला कृती समिती निखिल संतोष नाटकर,कोषाध्यक्ष सोमनाथ जगन्नाथ जाधव,संघ प्रेस फोटोग्राफर जितेंद्र चंद्रकांत काकडे,सोशल मीडिया प्रमुख मधुकर बनसोडे,पत्रकार रमेश कदम,सुभाष जेधे,फिरोज भालदार,ऋषिकेश जगताप, अजय पिसाळ शौकतभाई शेख,शरद भगत उपस्थित होते.
जागतिक अपंग दिनानिमित्त पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांचा सहानुभूतीपूर्वक सत्कार करंजे सरपंच भाऊसो हुंबरे यांनी करंजे ग्रामपंचायत वतीने केला व त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या