आपघात घडण्यापूर्वी नव्या इमारतीत शाळा सुरू करावी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी यांना साथ प्रतिष्ठानचे निवेदन.
लोणंद - लोणंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुले नं ०१ व ०२च्या इमारती शंभर वर्षांहून अधिक काळाच्या जिर्ण होऊन इमारत पडझड होत असताना विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊनच शिक्षण घ्यावे लागत असल्याने शासन दरबारी साथ प्रतिष्ठाण, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व लोणंद शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठपुरावा केला होता . चौकशीअंती संबंधित विभागांने या इमारतींचे निर्लेखन करण्याचे स्पष्ट आदेश दिले व या शाळा खोल्यांची नव्याने उभारणी करणेकामी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. थाटात भुमिपुजन कार्यक्रम आटोपल्या नंतर या शाळांची कात टाकुन नव्याने उभारणी होणार म्हणून पालक, शिक्षक व लोणंद नगरवासियांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले मात्र मक्तेदाराने गत साल २०२२विना तारखेचे कामपुरतीचे लोकप्रतिनिधींच्या नावाचे फलक चिकटवल्याने इमारतीचे संपुर्ण बांधकाम होऊन देखील या नव्या शाळेत स्थलांतर होणार कधी....? या नव्याने उभारण्यात आलेल्या खोल्या धुळ खात का पडल्या आहेत...? शाळांची कवाडे उद्घाटन प्रतिक्षेत असतील तर उद्घाटनाचा आदेश कोणाच्या लखोट्यात दडला आहे...? असे अनेक प्रश्न लोणंद नगरवासियांबरोबरच विद्यार्थी व पालकांना पडले आहेत. याचा जाहिर खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी करावा व आघात घडण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे हित व जिवाची काळजी करून तातडीने या नवीन इमारतीची प्रेरणादायी भिंतीचित्रांद्वारे रंगरंगोटी करुन विद्यार्थी पटसंख्या आधारित शिक्षक व स्टाफ उपलब्ध करून नव्या शाळा खोल्यांची कवाडे उघडी करावीत अन्यथा विद्यार्थी हितासाठी आम्हाला नाईलाजास्तव न्याय मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागतील अशा इशारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले लोणंद नं ०२ (PM श्री) शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन तथा साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी सातारा जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांकडे समक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.