दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
लहान मुलं अनुकरण करतात त्यामुळे त्यांच्या समोर पालकांनी जबाबदारीने वागावे - सुनील महाडिक.
फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, दौंड येथील तहसीलदार तुषार बोरकर व बारामती संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक योगेश नालंदे, दि एम्रल्ड हाइट्स प्री स्कूल अँड अकॅडमी चे चेअरमन दत्तात्रेय भारत शिंदे, अकॅडमीच्या प्रिन्सिपल अंजली दत्तात्रय शिंदे, अकॅडमीचे उपाध्यक्ष नवनाथ शिंदे, अजिंक्य शिंदे, नवनाथ पवार हे मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटराज पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले, प्रमुख पाहुण्यांनी अकॅडमीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर छोट्याशा बाल विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात केली. मराठमोळी लावणी, हिंदी चित्रपटातील गाणी, तुकाराम महाराजांची जीवन कथा, व जोरदार असे शिवाजी महाराजांचे आगमन घोडेस्वारी अशा विविध पारंपारिक नृत्यातून बाल विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर केली. साखरवाडीच्या इतिहासात असे कधीच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले नाही. असे आगळे वेगळे वार्षिक स्नेहसंमेलन जोरदार व उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुधीर नेमाने यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय भारत शिंदे, उपाध्यक्ष नवनाथ शिंदे, अजिंक्य शिंदे, नवनाथ पवार, व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम, शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार, मोनाली कुलकर्णी, शिवगंगा पवार, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर,शिरीन मुलाणी, मोनाली जाधव, अफसाना सय्यद, साधना संकपाळ, पल्लवी चौगुले, सुषमा गायकवाड व सर्व पालक व विद्यार्थी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.