बारामती शहर पोलीस बॉईज च्या वतीने अँड. मेघराज नालंदे यांचा सत्कार
बारामती : ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश विधि व न्याय विभाग कायदेशीर सल्लागारपदी अँड. मेघराज राजेंद्र नालंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बारामती शहर पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे यांनी सांगितले की, ऑल इंडिया संपादक संघाचे संघटना महाराष्ट्र राज्यातील २१ जिल्ह्यामध्ये आहे. संपादक पत्रकारांना येणाऱ्या कायदेशीर समस्याचे निराकरण करण्याचे काम ही संघटना करणार आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे, बारामती शहराध्यक्ष शितल शहा, कोषाध्यक्ष बारामती शहर विनीत किर्वे, पत्रकार माधव झगडे, सचिव शैलेश सोनवणे, संजय शिंदे, मनोज लालबिगे, बाळासाहेब डोळस, कल्याण मोहिते, सुखंदर प्रजापती, वैभव ननवरे, अनिकेत वनवे, प्रतीक झगडे, श्वेता डोंगरे, नंदिनी गुंदेचा, राहुल रासकर, अमोल गायकवाड, अमोल बिनवडे, पंकज पवार यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.