Type Here to Get Search Results !

सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल वेळेत न दिल्याने त्यावरील होणारे ५० लाख रूपये व्याज सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावे :- सतिशराव काकडे

सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल वेळेत न दिल्याने त्यावरील होणारे ५० लाख रूपये व्याज सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावे :- सतिशराव काकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२३-२४ सुरू होवुन कारखान्याने ४७ दिवसांमध्ये जवळपास ४ लाख ०५ हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. कारखान्याने दि.१/११/२३ ते १५/११/२३ या पहिल्या पंधरवड्यामध्ये १ लाख १० हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. त्याचे ३३ कोटी रूपये उस बिल कारखान्याने १४/१२/२३ रोजी दिलेले आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या शुगर केन कन्ट्रोल ऑर्डर प्रमाणे FRP रक्कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक असताना ही कारखान्याने उशिरा पेमेंट केलेले आहे. त्यामुळे कायद्या प्रमाणे पहिली उचल वेळेत न दिल्याने त्यावरील होणारे व्याज अंदाजे २७ लाख रूपये व दि.१६/११/२३ ते ३०/११/२३ या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये १ लाख ३९ हजार मे. टनांचे गाळप केलेले असुन त्या पंधरवड्याचे उस बिल अद्यापपर्यंत कारखान्याने सभासदांना दिलेले नाही. त्यामुळे कारखान्याने त्यावरील ही होणारे अंदाजे २३ लाख रूपये व्याज असे दोन्ही पंधरवड्यांचे मिळुन ५० लाख रूपये व्याज कारखान्याने सभासदांना देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच १/१२/२३ ते १५/१२/२३ हा पंधरवडा संपलेला असल्याने त्याचेही पेमेंट कारखाना उशिरा करणार असल्याने त्याचेही होणारे व्याज देणे कायद्याने बंधनकारक असणार आहे. याबाबत शेतकरी कृती समितीने कारखान्यास पत्र दिलेले आहे.
    चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे असताना
मग कारखाना उसाचे पंधरवडा पेमेंट उशिराने का करीत आहे? कारखान्याच्या चेअरमन व संचालक
मंडळास उसाची पहिली उचल जर ३०००/- रू. प्रती मे.टन द्यायची होती तर मग पेमेंट का
लांबविले? म्हणजेच कारखान्याने पंधरवडा पेमेंटचे अंदाजे ७४ कोटी ७० लाख रूपये सभासदांचे
बिनव्याजी वापरले आहेत. याचाच अर्थ कारखान्यावर ३०० ते ३५० कोटी रूपये कर्ज झाल्याने कारखान्यास उसाचे पेमेंट करण्यास अडचण येत आहे का? याचा खुलासा चेअरमन यांनी करावा.शेतकरी कृती समितीने कारखान्यास दि. ९/१२/२०२३ रोजी गेटकेन उस तात्काळ बंद
करून सभासदांच्या उस तोडीस प्राधान्य देणे बाबत निवेदन दिले होते. त्यावेळी कारखान्याचे कार्यकारी
संचालक व काही संचालक यांनी १०० टक्के गेटकेन उस बंद केला जाईल व १५ तारखेपर्यंत सर्व
वाहणे गटात घेणार आहोत असे आश्वासन दिलेले होते. परंतु कारखान्याने अद्यापही गेटकेन उसाची
तोड़ बंद केलेली नसुन आज ही गेटकेनचा कोवळा व कमी रिकव्हरीचा उस कारखान्यामध्ये गाळपास
येत आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दि. १५/६/२२ ते ३१/७/२२ पर्यंतचा ८६०३२ चा अंदाजे
६५०० एकर सभासदांचा उस रानात उभा आहे. तसेच कारखान्याकडे १५ जुन ते १५ जुलै या नोंद
असलेल्या ०२६५ अडसाली उसाची तोड कारखान्याने गाळप हंगाम सुरू होवुन दिड महिना झाला तरी देखील सुरू केलेली नाही. परिपत्रकानुसार सदर उसाची तोड ८६०३२ संपले नंतर होणार असल्याचे नमुद आहे. त्याचप्रमाणे कारखान्याने अजुन खोडवा उसाची तोड सुरू केलेली नाही कारखाना परिपत्रकानुसार २८ फेब्रुवारी अखेर तुटलेल्या खोडवा उसाची व पूर्व हंगामी उसाची तोड १५ डिसेंबर पासुन सुरू होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे सभासदांच्या आडसाली उसाची तोड पुर्ण होण्यास जवळपास ३१ जानेवारी उजाडणार आहे. म्हणजेच आडसाली उसाच्या तोडीसाठी १८ ते १९ महिने लागणार आहेत. सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे कॅनॉलचे पाणीही काही दिवसांमध्ये बंद होणार आहे त्यामुळे विहीरींचेही पाणी कमी होणार आहे. असे असताना सभासदांचा रिकव्हरीचा उस मागे ठेवुन गेटकेनचा कमी रिकव्हरीचा कोवळा उस गाळप करून सभासद व गेटकेन धारकांना समान दर देवुन चेअरमन यांना काय साध्य करायचे आहे? चेअरमन यांच्या चुकीच्या धोरणामुळेच सभासदांचे उसाचे वजन अंदाजे ५ ते १० मे.टन कमी होणार आहे. त्यामुळे कारखान्याचे चेअरमन यांनी सभासदांना ५० ते १५० रूपये प्रति मे. टन अनुदान देवुनही उसाचे टनेजच कमी झाल्याने
सभासदांचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे कारखान्याने काढलेल्या उस तोडीच्या परिपत्रकाच्या विसंगत संचालक मंडळ वागत असुन याचा भुर्दंड सभासदांना बसत आहे.तरी वरील सर्व परिस्थिती पाहता चेअरमन व संचालक मंडळाने तात्काळ गेटकेन उस १०० टक्के बंद करावा. व सभासदांच्या गाळपास येणाऱ्या उसाचे पंधरवडा पेमेंट वेळेत करावे. व कारखान्याने उशिरा दिलेल्या उस बिलाचे अंदाजे ५० लाख रूपये व्याज तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
■■■■■■■■■■■
शेतकरी कृती समितीच्या वतीने सर्व सभासदांना आवाहन करण्यात येत आहे की, दोन ते तीन
दिवसांमध्ये गेटकेनचा कोवळा व कमी रिकव्हरीचा उस बंद न झाल्यास प्रत्येक सभासदांनी यावर देखरेख करून तो योग्य पध्दतीने कसा बंद होईल याची दक्षता घ्यावी. घरी बसुन तुम्हाला न्याय मिळणार नाही कृपया याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी चेअरमन यांनी जाता-जाता आता तरी किमान सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असे आवाहन
शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
सतिशराव शिवाजीराव काकडे
अध्यक्ष, शेतकरी कृती समिती सोमेश्वरनगर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test