सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी हिची राष्ट्रीय साहसी विशेष शिबिरा करिता निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची एस. वाय. बी. ए. ची विद्यार्थिनी पापळ गौरी तानाजी हिची निवड दिनांक ३० डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन रिंग अँड अलाईड स्पोर्ट्स हातकोटी हिमाचल प्रदेश येथे संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय साहसी विशेष शिबिरा करिता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघामध्ये झाली आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे-देशमुख ,महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे-देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. अच्युत शिंदे कार्यक्रमाधिकारी ,दत्तात्रय दुबल कार्यक्रमाधिकारी प्रा. मेघा जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ. संजू जाधव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. राजुरवार, प्रा. मोरे, प्रा. शेळके , कुंभार इत्यादी उपस्थित होते.