स्तुत्य उपक्रम ! माजी कृषिमंत्री मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वरनाद कर्णबधिर'शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
पुणे प्रतिनिधी - माजी कृषिमंत्री मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र समाज उपयोग उपक्रम राबवले जात असतात अश्या उपक्रमाचे ननेहमीच कौतुक पवार साहेब करत असतात या या अनुषंगाने मुळशी तील उरावडे येथील सामाजिक कार्याची आवड असणारे माँट वर्ट वेस्टा चे व्हाईस चेअरमन महेंद्र विठ्ठल सावंत यांनी आपणही समाज्याचे देणे लागतो म्हणून माजी कृषिमंत्री मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आवश्यक खर्च टाळत उरावडे येथील स्वरनाद कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले त्यामुळे सावंत यांचे परिसरातून कौतुक होत आहे
या कार्यक्रम प्रसंगी रेणुका शुगर के बी के चे जनरल म्यानेजर हिमांशु गुप्ता, आर पी सिंग माँट वर्ट चे चेअरमन भास्कर सुपणेकर शाळेच्या मुख्याध्यापिका कविता खरे व इतर मान्यवर उपस्थित होते.