सार्वजानिक बांधकाम विभाग अंतर्गत ..त्या झाडांच्या फांद्या काढल्याने ऊस शेतकऱ्यांच्या नुकसानाला आला ; अनेक अपघात टळले
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल हद्दीत सोमेश्वर मंदिर रस्ता लगत काही झाडांच्या फांद्या ऊस वाहतूक करण्यासाठी व मुख्य बाजारपेठ करंजेपुल असल्याने व सोमेश्वर हे मोठे शैक्षणिक संकुल आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी व कामानिमित्त ये जा करणाऱ्या प्रवाश्यांसाठी अडथळा ठरत होत्या तसेच सोमेश्वर गळीत हंगाम चालू असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर ऊस कांड्या भरलेले जात असताना त्या फांद्याला ऊस धडकल्याने अनेक ऊस कांड्या रस्त्यावर पडत अनेक शेतकऱ्यांना नाहक नुकसान माती पडत होता तर पुडील दुर्घटना चा संभव ही नाकारता येत नव्हता ,त्या झाडाच्या फांद्या काढाव्यात या अनुषंगाने बातमी ही प्रसिध्द केली होती,सोमवार ११ रोजी सकाळीच त्या झाडांच्या अडथळा करणाऱ्या फांद्या सार्वजानिक बांधकाम विभाग बातमी ची दखल घेत काढल्याने त्यांचे आभार उपस्थित शेतकरी व नागरिकांनी मानले.