त्या युवकाचे निःस्वार्थ सामाजिक काम; त्यांच्या दृष्टीने होणारी दुर्घटना टळली हे महत्वाचे..
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपूल नजीक निरा- बारामती रस्त्यावर मधोमध एक पात्र्याचे मोठी प्लेट पडलेली असता... येणारे जाणारे दुचाकी व चार चाकी स्वार मात्र त्याला बगल देत जात होते ..सर्वानाच आपले काम व कुठेतरी कामानिमित्त जाण्याची घाई होती ...गर्दी पाहता थोड्यावेळ हे दृश्य पाहत हनुमंत शेंडकर यांच्या लक्षात आले त्यांनी आपली दुचाकी थांबवत ती प्लेट ओढत रस्त्याच्या साईट पट्टीच्या खाली ठेवून दिली त्यामुळे त्यांचे निस्वार्थ सामाजिक काम दिसून आले ..त्यांच्या दृष्टीने होणारी दुर्घटना टळली हे महत्त्वाचे असे शेंडकर यांनी बोलताना सांगितले
रस्त्यावरील प्लेट बाजूला घेत त्यांनी एक सामाजिक कार्य केले आहे ते बारामती भाजपा तालुका सचिव या पदावर कार्यरत आहे या कार्याबद्दल त्यांचे रस्त्यावरून जात असणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर चालकांनी शेंडकर यांचे आभार व धन्यवाद मानले.